कविता – अजित अभंग

कंटाळा

कंटाळा

वाढवून घेतला

दाढीसोबत

मग त्याचाही

कंटाळा आल्यावर

गुळगुळीत

दाढीच करून घेतली

आणि पुन्हा

दाढीचा कंटाळा

येईस्तोवर मग

गुळगुळत्या कंटाळ्यावर

घसरगुंडी खेळलो

मनसोक्त कंटाळेस्तोवर

तुझ्याही अनौरस पदराला बिलगून —-

दु:ख,

दु:खातून

सावरत असल्याचं

दु:ख,

दु:ख

संपत असल्याचं

सुरुवात,

दु:खाचीच

न आठवण्याची

ही वात,

पेटती ठेवणं

दु:खाचं

दु:ख,

दुखतंय ते
अद्यापिही न आकळण्याचं

दु:ख,
दुखत्याचं
स्वत:ला न कळण्याचं

दु:ख,
अलबेल सगळं
मानून चालण्याचं

दु:ख,
दु:ख

गुडघ्यांत अडकलेलं

दु:खं
गुडघ्याची दोनोळी हाडकं
पाहून
गुडघ्यात मेंदू नसलेलं.

आता
सरण आनंदी जगीन

वादा.


बघ दिवे तरंगताहेत


जनावर स्वत:ला नखं मारू
लागतं तेव्हा?
प्राणायमी मरणाचे दिवे
डोळ्यांत तरंगतात तेव्हा…
वाटेल सारं काही बरं होत,
फक्त आपल्याशिवाय
या जंगलात.

पाठुंगळीवर हल्की ओझी
असतील कर्माची,
म्हणून कुंडीतल्या
लाजाळूच्या पानासह
जे जगतंय त्यावर प्रेम केलं
असशील तरी तू…

निसर्ग देतो स्वात्तता कारण
तोच आहे स्वयंभू, म्हणून
तुझ्या प्रेमाचाही करू नको
माज.

निसर्गाला प्रवाह कळतो
स्थितीशीलते शिवायचा
त्याला ना भान प्रेमाच् ना
माजाचं,
त्याला फक्त बिमोड
करायचा असतो

मक्तेदारीचा सर्वांवर हावी

होण्याचा.

तू सजव साज

हा माज

तुझ्या माजाचा

मरताना तुझ्यातल्या

जनावरानं मारलेल्या

नखांचा.

बघ दिवे तरंगताहेत

पाण्यावर

निसर्गसंपन्न मरणाचे

या जंगलात.

– अजित अभंग, 7775955890