असो धर्म कोणताही
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन
भारतीय आहो आम्ही
करू देशाचे रक्षण
असो वर्ण कोणताही
क्षुद्र, क्षत्रिय,ब्राह्मण
हातात बांधले आम्ही
देशसेवेचे कंकण
असो वंश कोणताही
श्रेष्ठ, कनिष्ठ श्रेणीचा
मानले ना भेद आम्ही
मानवतेचे पाईक
असो प्रांत कोणताही
संस्कृती, सभ्यता ,
केला ना फरक आम्ही
एक सारेच स्थायिक
असो भाषा कोणतीही
नांदती सुखाने इथे
विविधता जपू आम्ही
जागृत अस्मिता इथे
असो लिपी कोणतीही
द्रविडी, देवनागरी
केला तो सन्मान आम्ही
लागली ती धग जरी
दुटप्पी जग
देवादेवात मी मानला नाही भेद कधी
असो येशू, अल्ला, साई नानक सत्यवादी
लोकालोकांत मग मानू कसा भेद सांगा
मुस्लिम ख्रिश्चन, हिंदू, शिख कशाला दंगा
माझ्यासाठी जगी मानवता अभेद आहे
कबीर साई चा मानवतेचा वेद आहे
नरनारी भेद निसर्गाचा एव्हढा आहे
रंग, वंश, धर्म मानवांनी मानला आहे
मनामनात का जाती भेदांच्या उभ्या भिंती
वरून हसरे मनात अमंगळ चिंती
- बाबू फिलीप डिसोजा, यमुनानगर, निगडी, पुणे
मो. 9890567468