- अॅड. जॉन रॉड्रिग्ज, 9821116898
आपण टीव्हीवर एक जाहिरात पाहतो, “एक वर्षाहून अधिक काळ होऊनही गर्भधारणा होत नसेल, तर तुम्ही प्रोजेनिसीस इन्फर्टिलिटी सेंटरला भेट द्या. फोन क्रमांक……. सदर जाहिरात ही वंधात्वासबंधी असते. सदर जाहिरातीचा आपण तौलनिक विचार केला तर आपणास असे आढळून येईल की, विज्ञान किती प्रगत झालेलं आहे. एखाद्या जोडप्यास लग्न होऊन काही काळ लोटल असेल आणि मुलबाळ होत नसेल तर डॉक्टरी सल्ला घेऊन, त्या जोडप्यास अपत्यप्राप्ती होते, आणि कुटुंबात आनंदी वातावरण होऊ शकते. तीस ते चाळीस वर्षापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. म्हणून एखाद्या जोडप्यास दत्तक घेण्याशिवाय दूसरा पर्याय उपलब्ध नहता. आणि दुधाची तहान ताकावर भागवता येत असे.
परंतु काळ बदलला. काळाबरोबर जीवनाची गणितं बदलली. माणसाची जीवनशैली बदलली. त्याचबरोबर आपला गरजा वाढल्या. उपलब्ध असलेल्या साधनाद्वारे (मर्यादीत) माणसाच्या गरजा पूर्ण होण्यास कठीणाई येऊ लागली. गरज ही शोधाची जननी आहे ह्या उक्तीप्रमाणे माणसाला विज्ञानाची मदत घेणे हे क्रमप्राप्तः झाले. Therefore, science is try to fulfil the vicissitudes of life म्हणजेच विज्ञानात उलथापालथ होऊन माणसाच्या जीवनात अनेक स्थित्यंतरे घडून येताना दिसतात. त्यातलेच एक स्थित्यंतर म्हणजे विज्ञानाने वंधत्वावर केलेली ही मात. निपुत्री म्हणणे अशी कुजकट वैचारीक सामाजिक घटकावर केलेली मात किंवा शापीत कलंकाला पुसून टाकण्याचा विज्ञानाने दिलेला दिलासा. असो. हा झाला इतिहास.
परंतु या वंधत्वावर एवढा ऊहापोह करण्याची गरज काय ?
कारण ऐंशी किंवा नव्वदीच्या दशकापर्यंत वंधत्वाबाबतीत काळजी करण्याचे कारण नव्हते. नवीन लग्न झालेल्या जोडप्यास वर्ष दोन वर्षामधे मुल व्हायचं; काहीक दुर्मिळ घटक सोडल्यास. परंतु, सध्याच्या परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात लग्नानंतर लवकर मूल होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. लग्न आता लग्न झाल्यानंतर जर एखादी विवाहीत स्त्री गरोदर दिसली नाही तर New news किंवा नवीन बातमी नाही वाटत, असं समाजात विचारणा केली आते किंवा विषय चर्चीला जाऊ लागतो. अशा घटना गावाकडील किंवा मागास वर्गीय समाजात दिसून येतात. त्याचा दुषःपरिणाम त्या नवविवाहीत स्त्रीच्या मनावर किंबहुना तिच्या कुटुंबातील सदस्यावर होतो. तसच ते कुटुंब एका अदृश्य तणावाखाली वावरत असतात. आणि त्या जोडप्यामध्ये न्युनगंड निर्माण होतो.
हे सगळं विस्ताराने सांगण्याचा हेतू हा की, अशी परिस्थिती आता समाज्यात का यावी आणि त्याचे कारण काय ? तुमचा, प्रश्न योग्य आहे. जरा साकल्याने आणि शोधक दृष्टीकोनांतून विचार केला, तर आपणास असे आढळून येईल की, ह्याला केवळ आणि केवळ कारण म्हणजे आपली बदललेली ‘जीवन शैली”. मग ती, सामाजिक, आर्थिक, भावनिक असो किंवा मानसिक समस्या असो. ह्या सगळ्या समस्यांचा आपल्या मनुष्यमात्रावर कळत नकळत दुष्परिणाम होत असतो.
पूर्वीच्या काळी ठराविक वयामधे नोकरी मिळायची किंवा माणसाला उपजीविकेचे साधन किंवा व्यवसाय मिळायचा आणि मर्यादित गरजा भागवून आपला संसाराचा गाडा पुढे पुढे रेटायचा. असं म्हणतात की, ‘बदल हा निसर्गाचा नियम आहे.’ काळाबरोबर माणूस बदलला. त्याच बरोबर जीवनाची व्याख्या बदलली. आधुनिक जगात प्रलोभने वाकुल्या दाखवायला लागली. मानवी मन त्याला बळी पडू लागलं. गरज नसतानाही नवीन गोष्ट हवीहवीशी वाटू लागली. ती गोष्ट किंवा वस्तू आत्मसात करण्यासाठी आर्थिक परिस्थिती उंचवावी लागली. त्यामुळे माणूस मृगजळाचा पाठलाग करु लागला. परिणाम, त्याला स्पर्धात्मक स्वरूप आलं. जीवन इतकं गतिमान झालं की, माणसाला उसंतच मिळू लागली नाही. पायाला जणूकाही चाकं बांधलेली. शेवटी माणसानी आपले ध्येय साध्य केलं. एक vicious circle पूर्ण झालं. परंतु साधन साध्य करण्यासाठी त्याची किती दमछाक झाली ती त्याला कळलीच नाही.
हा प्रवास इतका दूरचा होता की तरुणाईची वेळ व वय निघून जायला वेळ लागला नाही. आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी एक जागा (Post), दोन माणसाचा पगार तर तीन माणसाचं काम, हे सूत्र अवलंबावं लागलं. आर्थिक परिस्थिती उंचावली, परंतु, चैन की नींद गमावून बसलो. कुछ पानेके लिए कुछ गवाना पडता है। पैसा, हुद्दा मिळाला, परंतु मानसिक संतुलन बिघडण्याची किंमत मोजावी लागली. शाररिक हानी झाली. ना ठराविक वेळ खाण्याची, ना ठराविक वेळ घरी येण्याची ना ठराविक वेळ झोपण्याची, तर ना ठराविक वेळ प्रियकराबरोबर हितगुज करण्याची. मग तर शाररिक सुख घेण्याची वार्ताच सोडूनच द्या.
निसर्गाचे काही नियम आहेत. निसर्ग हा आपला गाडा नियमानुसार सुरळीत चालवतो. परंतु, त्यात बिघाड झाला तर अवकाळी पाऊस पडणार, तुफानी वादळे होणार, अंगाची लाहीलाही होणारी उष्णता होणार, तर प्रलय सद्रुष्य पूर येणार. आणि होत्याचे नव्हते होणार.
मानवी शरीराची रचना सुद्धा तशीच आहे. निसर्गातच शरीरामधे सुध्दा प्रत्येक अवयवामध्ये त्यांच्या कार्यात सुसुत्रता येण्यासाठी अनेक प्रकारची रसायने chemicals स्त्रवत असतात. त्याचे संचालन मेंदू करतो. भावना उद्देपित करण्यासाठी Dopamine व टेस्टेटोरीन केमिकल स्त्रवणे जरुरीचे असते. आणि त्यासाठी अनकूल वातावरण निर्मितीची गरज असते. पण लक्षात कोण घेतोय ?
करीअर करण्याच्या नादात वय कधी निघून गेलयू त्याचं माणसाला भान राहत नाही. वयानुसार प्रजनन अवयवावर त्याचा दुष्परिणाम होतो आणि गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण होते. ह्या सगळ्या समस्या मानवनिर्मित आहेत आणि त्याचे मूळ हे नवीन अवलंबीलेली जीवनशैलीत दडलेलं आहे. उच्चशिक्षण घेतलं असल्यामुळे गलेलठ्ठ पगाराची नोकरी. अपेक्षित नोकरी मिळाल्यामुळे त्याप्रमाणात काम करणे हे क्रमप्रातः ओघाने तणावा खाली कामाची पूर्तता ही आलीच. वेळेवर जेवन न घेणं, भूक भागवण्यासाठी फास्ट फूडचा आधार घेणं. अरबट चरबट खाल्याने अॅसिडिटी, पोटात दुखणं, अॅलर्जीचा त्रास वगैरे वगैरे आजार ओढवून घेणे हे आलंच. एक चीनी म्हण आहे की, सुखी जीवन म्हणजे शांत झोप. झोपेला तर आपण कधीच बाय बाय केलेला असतो. वास्तविक कामजीवन हे प्रेम व्यक्त करण्याची भावना आहे. वाढत वय हे शरीरात संप्रेरकी स्त्रवणाऱ्या कार्यप्रणाली होणाऱ्या बदलाची आपणास जाणीव होते, परंतु, त्याला जास्त महत्व न दिल्यामुळे त्याचा आपल्या वैवाहिक जीवनावर नक्कीच दुष्परीणाम होतो. त्यामुळे माणूस तणावाखाली वावरतो. आणि नकळत एकमेकामधे दुरावा व सुसंवाद न होण्याचे प्रमाण वाढीस लागतं. आणि सहजीवनातली मजा ही हळूहळू कमी होते.
परंतु, या सगळ्या समस्यावर आपण मात करू शकतो. त्यासाठी जोडप्यानी वैवाहिक जीवन जगत असताना चुकीच्या जीवनशैलीचा प्रथम त्याग करण्याची नितांत गरज आहे. दोघामध्ये जेवढा सहवास वाढवता, येईल, तेवढा वाढवण्याचा प्रयत्न करणे. वेळोवेळी तज्ञ डॉक्टराचा सल्ला घेणे हे तेवढेच गरजेचे आहे. योग्य आहार, वेळेवर खाणंपिणं, करीअररुपी मृगजळाच्या मागे धावणे कमी करणे, सहवास वाढवून सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास, वैवाहिक रुपी वेलीवर नक्कीच फूल उमलल्याशिवाय राहणार नाही. कारण, मुलाशीवाय कुटुंबाची व्याख्या पूर्ण होऊच शकत नाही. छोटंसं बाळ आपल्या पप्पा-मम्मीला सांगतं Father And Mother I Love You [Family].