सप्तरंग – ब्रिनल कुडेल

‘सप्तरंग’

संपन्न आयुष्यासाठी रंग सात,
करा हाताशी हात,

तांबडा आणतो तांबुडकी
ज्याच्या डुबकीने येते लाली,

नारंगी काडी
पसरवी हास्याची खाडी,

हिरव्याची हिरवळ
करी प्रसन्न मन,

पिवळा सोनेरी रंग
भरी आनंदी आनंद,

निळा प्रगतीचे प्रतीक
करी हर्षास आमंत्रित,

पारवा ना करी परवा
आणि समृद्धी नं सोहळा,

राहिला जांभळा
म्हणे करी मी स्वप्नपूर्ती,
मोहुनी टाके सर्वांसी…

संपन्न आयुष्यासाठी रंग सात,
करा हाताशी हात,
द्या फक्त साथ….

— ब्रिनल कुडेल, गास