संस्कृती वसईची..
जगभर कुठेही हिंडलो, हरवलो,भटकलो,
तरी मोकळा श्वास मिळतो तो माझ्या माय वसईतच!
जिच्या नावातच वसतो ईश्वर,
अशा वसईची महती ती काय वर्णावी?
इथली माती काळी भोर,
इथली माणसं हिरवी कोर,
इथली चौकटीच जणू मोर!
वसईची संस्कृतीवर प्रभाव मराठीचा,
तर कधी कोकणी व पोर्तुगालचा,
सर्व धर्म मिश्रित आमची वसई काही न्यारी..
अगदी कुणालाही कुठेही प्यारी…
निसर्गाची सुरेख देण,
कुपारी आणि वाडवली परंपरेचा मिलाफ,
वसईच्या जुन्या इतिहासाच्या खुणा,
जाणतात इथल्या रक्तसाक्षीच्या वेदना!
श्रध्देचा वारसा मिरवत,
समाजप्रितिने ओतपोत,
कादोडी नी वाडवली बोलीत,
मज्जाच आहे सारी!
वसईची परंपरा दर्शविते माया,
वसईचा किल्ला सोबत काया,
निवास इथे संत महात्म्यांचा,
डोलारा आहे शिक्षणाचा!!
वसईची संस्कृती टिकावी,
यासाठी अनेकांनी केले सहन,
कारण इथला विषयच आहे गहन!!
या एकदा वसईला,
ही भूमी नाही तर आहे मान अमुचा!
- ब्रिनल क्रास्टो, नंदाखाल,परसाव