खीत – सुनिल डिमेलो

खीत

खीत आलॅ यार

खरास जाम खीत आले

हिंदाळ्यात जॉरात हॅफॉ धरॉन गाव्याशी

लाईट गेलिगा ओट्योर जमॉन खेव घाल्याशी

आन हांचापारा कागडॉ खुड्याशी खीत आले

काळोख पड्यापोत बॅट बॉल खेळ्याशी

गावात खुरसा हनाला व्हीसीआर वर पिच्चर बग्याशी 

आन नाताळश्या हनाला खळ घॅऑन पताके चिकटव्याशी खीत आले

शिस दॅऑन बोरे घ्याशी

हॅतातश्यो हिंगो सॉरॉन बांडी बुझ्याशी

आन लॉका माडोर सडॉन नाळ पाड्याशी खीत आले

आहऱ्या तॅसाला मिळणारॅ बाफेलॅलॅ सनॅ खाशी

आयत्वारॅ कोंबडीआ मुंडी-पायाय जिव्याशी

आन मावशीनॅ आढलेली हॅवबुंदी खाशी खीत आले

अम्मा हरी विराडा बजारा जाशी

निर्मळश्या जत्र्यात विजी पाळण्यात ब्याह्याशी

आन वांद्र्या देवळा जाऑन काळॅ सनॅ हाड्याशी खीत आले

शाळीत जाताना तापना करॉन हॅक्याशी

सायमन-आस्वाद मिनसॉ वडापाव खाशी

आन दांड्याखालनॅ सायकल सालव्याशी खीत आले

छायागीत आन चित्रहार बग्याशी

हिनवारॅ हांचापारा टिवीवर मराठी पिच्चर बग्याशी

आन दिवाळी रज्यात लॉका दारा मिंगरशॅ फटाकॅ जमवॉन दारूगॉळॉ काड्याशी खीत आले

खीत आलॅ यार

खरास जाम खीत आले

माला या जकल्याई खीत आले

तुमाला क्याई खीत आले…

  • सुनिल डिमेलो (मँगो माहनू), नंदाखाल