कविता – रवीन्द्र दामोदर लाखे

विस्तार

तुझा विस्तार करीत गेलो तर कुठं कुठं पोहोचलो मी

थर मध्ये कच्छ मध्ये हिमालयात नागालॅण्ड आसामवगैरे

सगळं राष्ट्रगीतच पालथं घातलं तर तिथं कुठला प्रदेश दिसेना-

आव्याका बाहेर गेलास तू – 

मखर करता येईल थर्मोकोली तुझ्या स्तुती शब्दांच –

बसावं लागेल तुला आत – 

बाहेर टाळ कुटाळ वाजतील धर्म अधर्माचे – 

त्या आवाजांनी तुला घाम फुटू दे

तुझ्या पायाखाली तुझ्या घामाचा समुद्र उसळू दे

विसर्जन होईल आपोआप तुझं 

नि थर्मोकोली मखर तरंगत राहील काही काळ – 

स्तुतीसुमने पूर्ण सडेस्तोवर

  •  रवीन्द्र दामोदर लाखे