उपकारी निसर्ग
या हो या, या हो या
हा निसर्ग वाचवू सारे, हा निसर्ग वाचवू सारे
हा निसर्ग वाचेल जेव्हा, जीवसृष्टी जगेल तेव्हा .
या हो या….
१. झाडे लावू झाडे जगवू, एकच धरुया ध्यास
धरतीचे उपकार हे फेडू, ठेऊ मनी ही आस
सजवू धरती, सजवू नाती पाहू स्वप्नं हे आज
या हो या …
हा निसर्ग वाचवू सारे…
2.आकाशातील पक्षांना ह्या घेऊदे हो श्वास
भुमीवरच्या प्राण्यांना ह्या जगू दे मोकळे रान
पर्यावरणा साथ देऊ या, करू प्रतिज्ञा आज
या हो या…
हा निसर्ग वाचवू सारे
3. दूषित पाणी, दूषित हवा ही, थांबवू सारे आज
प्लास्टिकचा वापर हा टाळू, स्वच्छ ठेवू समाज
एकामेका साह्य करू या, बनवू स्वर्ग हा आज
या हो या ….
हा निसर्ग वाचवू सारे…
जॅकसन फिलिप आल्मेडा
भुईगाव सामणी आळी
almeidajack1983@gmail.com / 7798636723