सीसीटीव्ही प्रोपोगंडा आणि बळी – महेश लिलापंडित

सीसीटीव्ही प्रोपोगंडा आणि बळी

मी पहायचो

ओबड औरस

धोबड चौरस

मित्र तुझ्यात

पण

तू राहिलास ओरडत

भूमिकाफू

रंग रंग रंग

चेहरा पट्टी जात

खतरकान अतोनात

नि

तू मला दिसतो

रंग

चेहरा पट्टी जात

भूमिकाफू सूरसुर धूर

जात स्टिकर

तू दिसत नाही मित्र

नि

आता तुझी

अक्रार विक्रार तक्रार

की मला विकार मित्रांधत्वाचा

नि माजवतोस तू

समाज माध्यमात महापूर

तू बळी असल्याचा

नि

आता मी

अफूग्रस्तांनी

थकव�

  • महेश लिलापंडित