अनंत काळची माता
त्याचं पौरुष क्षणाचंच
म्हणून ती क्षणाची पत्नी
तिच्यातलं बाईपण मात्र
दिवस रात्रीच्या मुठीत न मावणारं
यमुनेच्या डोहासारखं अक्षय अबाधित
आणि आईपण
ते तर गंगेसारखं अखंड प्रवाहित
शुभ्र धवल अमृतधारा होऊन
लेकराला सिंचणारं
जन्माआधीपासूनच त्याच्याशी जोडलेलं
म्हणून ती अनंत काळची माता
त्याला मात्र आपल्या बापपणावरही
नाही सांगता येत दावा
- संगीता अरबुने, वसई