अभागी भारतमाता
जातीच्या व धर्माच्या अग्निकुंडात
भरडला जातो सामान्य जन,
सामान्य स्त्री जमात.
ज्या भारतमातेला
आई, आजी, मावशी, मामी, काकी, बहीण, मुलगी म्हणून पुजले जाते
तिथे नारीची होते विटंबना.
धर्मांध व जात्यंध घालतात
तिच्या पदराला हात
तिला विवस्त्र करतात, तिच्यावर अत्याचार करतात,
तिच्या अब्रू चे धिंडवडे काढतात.
कार्ल मार्क्स म्हणतो
धर्म ही अफूची गोळी आहे,
हे खरे आहे का?
प्रत्येक धर्माची निव
प्रेम दया शांती ह्या तत्ववावर
विसावली असताना
हे कसं शक्य होत!
मग हे धर्माचे नराधम
ज्या योनीतुन जन्म घेतात
ज्या स्तनातून दूध प्राशन केले
त्या नारीला कसे विसरतात
त्यांना फक्त स्त्रीतली मादीच दिसते का?
आपण हे उघड्या डोळ्यांनी कसे पाहू शकतो?
आपल्या संवेदना संपल्या का?
आपण नामर्द झालो का?
बाप्पा, आम्हाला माफ कर
— जॅक गोम्स, आई,चुळणे,वसई.
संपर्क – 9028195888