​चारोळया – आयवन क्रास्टो

चारोळया

सूर्याकडे नजर देऊन होतो,

ठरवलेच होते.

तेजोमय काळोखात,

आंधळे व्हायचे होते.

 माझा अहम् मध्येच,

कधीतरी उगवत राहतो.

मग, सागर किनारी जाऊन मी,

मावळतीचा सूर्य डुंबताना बघत राहतो.

 मध्हयानीचा सूर्य,

डोक्यावर येऊन बसतो.

मावळतीचा ……….  ,

पायाशी येऊन गुडूप होतो.

 माझ्या समोर त्याने,

सृष्टीला प्रकाश दिला.

माझ्या समोरच हे जग,

अंधारात बुडवून गेला.

  • आयवन क्रास्टो, उमराळे, वसई

मोबाईल – ९९८७७८७०५६