कंबारडा पार मोडला

  •  फ्रान्सिस डिमेलो सर, नंदाखाल

त्यावहरा रोईनीतूस आगोठ सुरू जाली  आन हारकॅाहुरकॅा पानी पडलॅा. राबाई ऊब जा नाका भुगून लॅाकांई हारजिकीओर पेरन्यो केल्यो.  मिरगात पानी मॅाजाॲा पडल्यामुळॅ आवने बरे पटकान वाडले. जेठी पूर जालॅा. उखळन आटपे तंव शिक्कल कऱ्यासॅा वखत आलॅा.  संज्यावसॅा हन यादो तळेबावी बऱ्यापैकी भरले. आवने जेमतेम मूठ बांद्याओडे जाल्याबरबर लॅाकांई आवन्यो धरल्यो. 

दुज्याई आंवदा आवनी घनीस नोती.  एक भॅाठा हॅत फिरावरी हॅाता. आंवदा ता त्या भॅाठ्या गंवादरी हॅाता. शारपास दिहातूस दुझ्यायो आंवजो आटपाल्यो. दाडी वाॲान, उळूद पॅरॅान जालॅा.  भादवडी माल अजून कापतॅा जालॅा नॅातॅा. जेमतेम आठानॅ बारानॅ जालतॅा बास त्याबननी लागवडीला टाईम हॅाता.  केळीत डॅाकावॅान यासा याबिगार  घनास कय काम नॅाता.

यंदा भादवडी माल बगॅान दुझ्या मनातशा मनात खूश जालतॅा. अडीचशे केळीॲा तापॅा हॅातॅा. दोनशे सव्वादोनशे लॅांगरा तॅ नक्की कापॅदॅ. शेटनॅ हारकीहुरकी पट्टी जॅ दिली, हूट घनीस धरली नाय तॅ यंदाॲा माल पॅाराआ लग्नादो बऱ्यापैकी हाथ देदॅ या खुशीत दुझ्या शेटशा वाडीआ रस्त्याला लागलॅा.  

हां, आंवदा माआमिनॅ दुझ्या​ भॅाट्या पॅाराआ पेद्रूआ लगीन धरलोता. त्यापुडनॅ दुझ्यानॅ दोन पोऱ्यो वराडॅान हाऱ्या धाडल्योत्यो. दोगीॲ हनपाळनॅ करॅान जालतॅ.  पॅाराआ लगीन अहल्यामुळॅ घराई थोडी डागडुजी करना भाग होती. आन मग ॲाबायदो थॅाडॅा हमदाव, कपडालत्ता, घनॅ नाय तरी शेदोनशे लोकाआ हाथोरती पानी घालना भाग हॅाता. याकरता तॅला एकूस आदार हॅातॅा तॅा मिंजॅ शेट आन भादवडी माल. 

शेटला आपली गरज कहीं पटवॅान द्याशी याई मनातशा मनात शब्दाई जुळवाजुळव करीत दुझ्या निंगालतॅा.  वाटॅत बिशाकॅापात भॅटलॅा पन दुझ्याला त्याआ भानूस नॅाता. तॅास बोयलॅा, “कॅापात, आज बों विसारात दिखात्या तॅ.“  “कय नाय, ॲांहॅांस, निखळॅास“ आंहा कयतरी अडखाळात  बॅालात दुझ्या पुडॅ निंगालॅा.  शेटसॅा माहनू तडॅ कावडीॲ लोंगरे वाईतोतॅा. तॅा हांगातॅ, “शेट हल निंगूत घारा गॅलॅा बास. जेमतेम घराॲ पॅासलॅ हायदॅ.“

आज कय करॅान शेटशी भॅट घ्याशीस आंहा ठरवॅान दुझ्या शेटशा पाठोपाट शेटशा बंगल्योर पॅासलॅा. पायरीओर सड्याशा आदीस तॅनॅ टोपी काडॅान हातात धरली. पोन्याई उटी खोशिलती ती खाला होडली. पायात पायताणे तॅ नोतेस.  तॅा घाबरात घाबरात पायऱ्यो सडलॅा आन आडॅ तडॅ बगीत मेडीला टॅकॅान खाला बॅहलॅा. 

शेट पानगॅा खाॲान, कनेरी पॅॲान तॅांडात पान टाकीत बायार आलॅा. शेटला बगिल्याबरबर दुझ्या ताड्कन उबॅा रॅलॅा आन तॅनॅ शेटशापुडॅ हाथ जोडलॅ. 

“आरे दुझ्या, तू कतॅ आलॅा ? आन ॲांहॅां खाला कादो बॅहल्या. फलाटीत बॅहॅ गनाय“ आंहा बॅालॅान शेट आरामखुर्शीत बॅहलॅा.  पन दुझ्या “रेऊं दे रेऊं दे“ बॅालात तडेस उबॅा रॅलॅा. शेटसा तॅांड पानाए भरलोता. तॅनॅ थुक्यादो उठताना बिड्याई बशी आन कांड्यापेटी दुझ्यापुडॅ धरॅान बोयलॅा, “आरॅ एक बिडीतरी घॅ“ पन शेटशा समोर बिडी  कंहीं प्याशी ? ॲांहॅां विसार करॅान तॅनॅ बिडी कय घेटली नाय. पानाई पिसकारी टाकॅान परत खुर्शित बॅहॅता बॅहॅता शेटनॅ विसारला, “हां बॅाल दुझ्या क आलतॅा ? का काम काडलोता ?” दुझ्या वाटूस बगितोतॅा. तॅनॅ शेटला पॅाराआ लगनाआ हांगिला.

घराआ हांगताना तॅा बोयलॅा,”आतॅ जरा दिही बदलल्यात, पॅाराला एका बाजूनॅ बारकीशी खोली काडॅान द्या लागे. थॅाडा हॅाना नाना ! पन शेट आंवदा माॲा माल बरॅा भरदॅ. तुमे पायतॅ एकदा यॅॲान तापॅा बगा.  आठानॅ, बारानॅस जालॅ पन पंद्राएक दिहात कापनी सुरू हॅायदॅ.“

“हं, तुॲा माल बरॅास आहातॅ पन आतॅ मालाला पयल्याहारकॅा उठाव रॅलॅा नाय. जळगावातनॅ वॅगनशो वॅगन भरॅान या लागल्यापासून जरा मंदीस पडले. ता जाऊं दे.  कॅाडॅ पाओतॅ ?“

शेटला आकडॅा हांगना तॅ भाग हॅातॅा. पन आकडॅा थॅाडॅा बॅाठॅास हॅातॅा भुगून जरा अडखाळात दुझ्या बोयलो, “शेट, पाचशेपरांत मिळद्याद तॅ बरा हॅायदॅ. यंदा मालात सगळॅ फिटॅद्यात. बिआमिंजॅ मा आंगोर गॅल्या सालशी एक दिडकीसुद्दा नाय.“ दुझ्यानॅ त्यांई बाजू मजबूत केली.  

“पाचशे ॲाडॅ नाय पन सद्या तीनशे गॅहॅान जाय. माल कापतॅा जालॅा गा बिॲ दोनशे देनॅ.“ आंहा बॅालॅान शेट आतमिनॅ गॅलॅा आन पैशॅ आन सोपडी गॅहॅान आलॅा. तॅनॅ दुझ्याआ खाता बगिला. दुझ्या आंगोर ना मागशी बाकी गा नाय वहराभरात कुहनी उसल. ता बगॅान शेट खूश जालॅा. तॅनॅ दुझ्या हातात पैशॅ देत हांगिला, “नीट मॅाजॅान घॅ आन अठ्ठ्या सई कर.”

शेटनॅ मोडीत कयतरी लिविलता. दुझ्याला मोडी कय कशात नॅाता. दुहरीपोतूस हिकलेतॅा. जेमतेम सई करतोतॅा.  बि मिंजॅ नीट वाशासा मिंजॅ शेटवर अविश्वास दावडल्याहारका हॅायदॅ भुगून तॅनॅ शेटनॅ हांगिला तडॅ पटकान सई केली. शेटनॅ मुद्दाम तॅला रक्काम  त्यासमोरुस मॅाज्या लाविली. 

दुझ्यानॅ कतॅस पैशॅ बुडविलॅ नॅातॅ आन कतॅस सोरेसारे लोंगरे भय्याला दिले नोते. त्याबननी शेटनॅ खुशीनॅ पटकन पैशॅ दिलॅ.  शेटनॅ घनॅस आडॅवॅडॅ घॅटलॅ नाय आन पटकान खॅप्पॅन तीनशे रुपये दिलॅ, या दुझ्याला भॅाटा नवालूस वाटला. तॅनॅ मनात एविजालता गा तीनशार खेपो घाल्या लागॅद्यात तिगाळा कडॅ शेट शे दोनशे रुपये हातोर टेकविदॅ.  पन जाला उलटास.  तॅा जाम खूश!

त्या मनात आलता गा या खुशीत एखादी नवटाक घ्याई.  पन घारा जाॲान कतॅ एकदा बायकूला हांगातॅ आंहां तॅला जालता. तॅा तॅांहॅांस तडाक घारा गॅलॅा. दुज्याई बायकू त्यांई वाटूस बगितोती. “भाटात डॅाकाॲान येतॅ“ आंहा हांगॅान कारबारी गॅलॅ तॅा अजून कय नायदॅ आलॅा. मावऱ्यापान्याॲा पत्तॅा नाय.  अंहॅा विसार करॅान ती काट्याआ कालवान कऱ्या लागलोती. दुझ्याने सगळी हकिकत तिला हांगिली आन हॅान्या कपड्यालत्त्याकरता दोनशे रुपये तिआ हाथोर ठोयलॅ.  बायकूआ काळीज हुपाॲाडा जाला. 

या गोष्टीला जेमतेम आठ दिहीस जालॅ हायदॅत.  आखाडाॲा शेवटसॅा दिही मिंजॅ गटारी अमावास्या! दुहऱ्या दिहापासून हरावन सालू.  बी लोक मटन, कोंबड्या मांगॅ.  कुन मुंडी घ्यादो तॅ कून ओदडी घ्यादो. त्यात पातेरातपासून पाण्यानॅ झॅंबाड घायलती. घनॅास जॅारात नॅातॅा तरी न थांबतां पडतोतॅा. कय काम करॅान देत नॅातॅा.  सगळे घारास होते भुगून दुझ्या बायकूनॅ मॅारायॅ लाडू कऱ्यासॅा बेत कॅलतॅा.  लवकर जिवने आटपॅान तिनॅ पीठ बाफ्या ठोयलॅा. कांदॅ आदीस कापीलतॅ. हळूहळू पान्याॲा जोर वाडलॅा.  त्या जोडीला वारा हुटला.  वाऱ्याई आन पाण्याई जहनी पैज लागलोती.

दॅागांॲा जोर वाडातूस गॅलॅा.  आंगळ्यतनॅ पानी वाया लागलॅा. माड गरगरॅ फिऱ्या लागलॅ. धडाधड मॅाड्या लागलॅ. कुनाए घराए कवले उडले तॅ कुनाए घॅानॅ.  ई सादासुदा वारा नाय तॅ भॅाठा सकरी वादळ हाय ई लॅाकांई ओळखीला. जकल्यांना आतॅ केळीई धास्ती लागलोती. पन भाटात जाशी कुनाई हिंमत नोती.  दॅापारा एक तॅ अडीच  या वेळात  वाऱ्यानॅ नुसता थैमान घायलता.  केळी ताफॅ शॅ ताफॅ आडवे होया लागलॅ.  पन भाटात जाशी कुनाई हिंमत हॅात नोती. पान्याॲा नुसतॅा काळोख ! ज्यांई त्यांई जाॲान पोरे शाळीतनॅ कहें बहें घारा हाडलोते.  दॅापरशी हांज कतॅ जाली आन हांज्याई रात कतॅ जाली कुनालास कळला नाय. 

हाकोबॅाठ्यादो सगळा सामसुम जालता. नाय वारा, नाय पानी ! जॅा तॅा उठलॅा तॅा सॅाप्पाट भाटात धावलॅा.  तडॅ का बग्यासा ? एक कुनाई केळ जाग्योर उबी रेली नोती.  आयनॅ पोरे वॅंगॅत घॅॲान निजल्याहारक्यो केळी लोंगरे वॅंग्यात घॅॲान आडव्यो जालत्यो.  त्या आदाराला बांदिलेले टोकरे त्या पाठीओर ! आख्खे भाटे उजाड जालते. दुझ्याने अर्दे मुर्दे पडलेले लोंगरे बगिला आन त्या मांड्यातसा बळूस गॅला. तॅा तॅांहॅांस बतकान बॅहॅलॅा. या लोंगऱ्या जीवोर तॅनॅ मनात कॅाडॅ इमलॅ बांदिलतॅ. शेटदरनॅ आंगोर पैशॅ घेटलोतॅ. आतॅ शेटला तॅांड कांहा दावड्यासा या विसारानॅ त्याॲा तॅांडसॅा पानीस पळालॅा. 

दोनशार दिही दुझ्या निखळॅास भाटात जाॲान येतोतॅा. त्याला कईस सुसात नॅाता. शिकलात पडलेले लोंगरे कय पान्यात कुया लागलोते तॅ कय अर्धवट पिक्या लागलोते त्यात कुत्रे फिरातोते.  ता बगॅान दुझ्या डॅाखा फिऱ्या लागला.  तॅा तॅाहॅांस मांगॅ फिरलॅा आन घरशा वाट्याला लागलॅा. ॲाड्यात समोरनॅ नॅमकॅा शेट आलॅा.  कडॅ निकॅा गा पळॅा आंहां तॅला जालता. तॅनॅ पटकन टोपी काडॅान मान लविली.  आन शेटशापुडॅ हाथ जोडले.  खाला मान घालॅान तॅा बोयलॅा, “शेट, माफ करा. एक लॅांगरा जाग्योर रॅला नाय. पन मॅ तुमशॅ पैशॅ बुडव्यासॅा नाय. कय तरी करॅान वाळनॅ.“ बॅालताबॅालता त्या डॅाळ्यातनॅ आंहों वाया लागले.

शेटला जाम वाईट वाटला. शेट दुझ्या पाठीओर हाथ ठॅाॲान बोयलॅा, “दुझ्या, तू एकल्यास नाय. सगळ्याॲास सत्यानास जालॅ. वादळवारा कतॅ प्रपंच करी नाय. तॅला जकले हारके. जा तुआ तास माआ जालॅ. सगळ्यांईस कंबार पार मोडली. का कऱ्यासा ? नशीब आपला बि का? “  आंहां बॅालॅान शेटनॅ कब्जाआ खिशात हात घायलॅा. दा दाश्यो दा नोटी त्या हाथात ठॅाॲान तॅा बोयलॅा, “ सगळ्यो केळी साफ कर.  हिंग्यो काडॅान लागवड करॅान घॅ. सगळी जमीन हारकी करॅान  काळे रवयशे वांगे लाव नातॅ दोद्याॲा मांडव घाल.  शार पैशॅ मिळद्यात. नुसतॅा हाथ बांदॅान आन रडॅान कांहां सलदॅ.  सल कामाला लाग. पैशा आपुन नंतर बगॅा. त्यांई तू काळजी करॅा नाका“

         आपल्यापुडॅ शेट नाय तॅ देव उबॅा हाय आंहा दुझ्याला वाटला.  त्या आंगात हत्तीआ बळ आला. त्या पायातसुद्दा ताकद आली. शेटनॅ आबार  मानीत तॅा घारा निंगालॅा.