“हरवलेली माणुसकी”
प्रेम केलं होतं तिने त्याच्यावर
वाट पाहत होती लग्न करायचे तर ह्याच्याशीच
आई बाबा, घर दार दिलं सर्व सोडूनी
केली नाही कशाचीच पर्वा
फक्त मिळावी त्याची साथ….
पण त्याच्या मनात काही वेगळंच
प्रेम नव्हते, लपली होती ती वासना
अधीर बधीर झाले होते त्याचे मन
नको लग्न, नको प्रेम तुझे
पाहीजे होते फक्त शरीर त्याला….
घट्ट घातला मुलीने लग्नाचा
तेव्हा 36 तुकडे आले तिच्या वाट्याला …. तिच्याच शरीराचे…!!!
कसे नाही त्याचे हात थरथरले तेव्हा
त्याच्या हृदयाला का नाही पाझर फुटला
का नाही त्याला लाज वाटली आपल्या ह्या कृत्याची
कुठे हरवली आहे माणूसकी ही…
ह्या राक्षसांच्या मुठीत
अजून किती मुली सापडणार
अरे…कमी पडेल त्या राक्षसाला फाशीवरील शिक्षाही!!!
अश्या लोकांमुळे
जनांवरासारखे मरण यावे का प्रेम करणाऱ्यांना
कुठे आहे न्यायदेवता
कुठे आहे स्वातंत्र्य
कुठे आहे कठोर कारवाई
अन कुठे आहे माणूस म्हणून माणुसकी..
खरंच इतकी कशी हरवली ही माणुसकी ..
सापडता सापडे ना…
आतातरी परतुनी ये ना हरवलेली माणुसकी…
हरवलेली माणुसकी
© मेल्सीना तुस्कानो परेरा, नंदाखाल, 9028606631