ह्या गोजिरवाण्या हाताचे भविष्य तुमच्या हाती,
ओ शिक्षकहो भविष्य तुमच्या हाती…
नव्या पिढीचे, नव्या दिशेचे सुर हे गाती,
ओ शिक्षकहो भविष्य तुमच्या हाती…
नव्या आशा, नवीन योजना असेल त्यांच्या मनी,
ओ शिक्षकहो भविष्य तुमच्या हाती…
नवे विचार, नवीन आचार घेऊनी पुढे चालिती,
ओ शिक्षकहो भविष्य तुमच्या हाती…
नवे वागणे, नवे चालणे मनास नाही पटती,
बदल हा नवा पाया, म्हणुनी
ओ शिक्षकहो भविष्य तुमच्या हाती…
भाषा आणि गणित आहे पाया,
म्हणुनी झिजवू आपुली काया..
ओ शिक्षकहो भविष्य तुमच्या हाती…
घेऊनी हातात हात करूया राष्ट्राचा विकास,
आपण नमुया,भविष्य घडवूया…
- ब्रिनल क्रास्टो, नंदाखाल (परसाव)