“लेडीज रुमाल”
मिटलेल्या मनाच्या पाकळ्यास,
ओंजळीतून गळण्याआधीच,
शिंपण चांगल्या विचारांचे,
खुप सुंदर फुल ते जिवनाचे.
गंजलेल्या तारातून छेडले सुर,
जीवन गाणे असे जरासे दुर,
तडफडला ह्रदयातून बाण,
कोमेजलेले जीवाचे रान.
मागेच भिजून वाहिले सुख,
थांबावर थिजुनी राहिले दु:ख,
ओलीचिंब डोळयातली नजर,
मिटलेल्या ओठाची ती चादर.
चटकन उठून आली सनक,
डोक्यातच गेली तडक,
हळहळला जरासा जीवा,
दाटूनिया मौनातल्या गळा.
असतेच दुखणे जागोजागी,
निपटून सहज काहीबाही,
सुखदुःखाचा धागा या जिवनी,
अंथरलेले आयुष्यच तर विणूनी.
- हेडविजेस रुमाव, गास