पाऊस
पावसाचं ऋतुचक्र बदललं
कधीही असतं आभाळ भरलेलं
अवेळी जेव्हा पाऊस पडतो
बाप माझा शेतात रडतो
हिरवे शिवार गेले झोपून
पिकलं घरा कसं आणू कापून
कणग्याचा भाव,अंदाजाने मापून
खरं बियाणं ठेवलं सारं जपून
वर्ष भर मेला, शेतात खपून
कशी बरं करावी शेती खपून
कापणीच्या दिवसांतलं हे पाणी
थोपविल का आभाळ कोणी
कोण पुसणार डोळ्यातलं पाणी
- शकुंतला नारायण पाटील, नवाळे