नेता
नेता जगाचा त्राता असतो
जेव्हा तो भ्रष्टाचारात फसतो
कार्यकर्ता ही त्याचा नसतो
जेलमध्ये एकटाच आटा पिसतो
जनतेला खोटी आश्वासने वाटतो
आज कुणी भेटताच गळा दाटतो
जनतेच्या पैशात इस्टेट थाटतो
इडीपुढे नम्र होऊन पाय चाटतो
देशसेवा करणे गेला विसरून
हव्यासापोटी पाय गेला घसरून
सोने,चांदी,इमले जाळे पसरून
आज मरतो जेलच्या इशार्यावरून
काल कार्यकर्ता उडत होता
गल्लीबोळात हप्ते येता जाता
आज त्याला कोण पूसत नव्हता
नेता जात्यात,तो सूपात होता
कष्टाची भाकरी असते गोड
भाईगीरी आता तरी सोड
माणूसकीची नाती जोड
भ्रष्टाचाराची मोड तू खोड
घर तुझं सुखात नांदेल
बाप अभिमानाने सांगेल
पोरगं लई दिनरात खपते
सार्या गावालाच जपते.
- शकुंतला नारायण पाटील, नवाळे