द जायंट विदीन…
— इग्नेशियस डायस
5.
1.
हे जाम भारीये. म्हणजे कसंय ना आपल्याला कोणी ओळखत नाही. म्हणजे लोकांना कळतंच नाही की या मुखवट्यामगे कोण आहे. आता मंजिरीला कसं कळणार की ही जी कमेंट तिच्या फोटोवर टाकलीये ती मीच टाकलीये म्हणून! आयुष्यात कधीच कळू शकत नाही.
हे जाम भारीये. म्हणजे कसंय की आपण लपलेलेच असतो तरी सर्वांसमोर असतो. बर्याचदा आपल्याला बर्याच गोष्टी बोलायच्या असतात आपण त्या समोरासमोर बोलू शकत नाही. कसं सांगायचं एखाद्याला की तू चुतीया आहेस! सांगता येत नाही न थेट! तर एखाद्याला तू चुतीया आहेस हे सांगण्याचा हा एक खास मार्गच आपल्याला मिळाला. विराज परब. नाव पण सालं एकदम खास मिळालं! गोलमटोल. या नावातून लोकांना आपल्याविषयी काही म्हणता काहीच अंदाज येवू शकत नाही. म्हणजे आपण एलायसी एजंट आहोत की सुजुकीच्या शोरूममध्ये सेल्स रीप्रेजेंटेटिव आहोत की आपला स्वत:चा छापखाना आहे की आपण पत्रकार आहोत की आपण होली ट्रीनिटी स्कूल मध्ये प्यून आहोत की आपण टीएमटी बसचे कंडक्टर आहोत की आपण बडा ख्याल फॅमिली बार अँड रेस्तौरेंत मध्ये वेटर आहोत की आपण साधे एसी मेकॅनिक आहोत आणि रोज कॉल अटेंड करून आपण लोकांचे एसी धुतो की आपण विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता आहोत की आपण देवभक्त आहोत की आपण देवभक्त नाहीहोत की आपण देशभक्त आहोत की आपण देशभक्त नाहीहोत. काही म्हणता काहीच कळू शकत नाही आपल्याविषयी लोकांना.
दोनेक वर्षे तरी झाली असतील आपण या नावाने आयडी सुरू करून. तेव्हा का सुरू केलेला ते आता आठवतदेखील नाही. सुंदर मुलींचे प्रोफाइल्स चोरी चुपके पाहता यावेत एवढाच माफक आणि निरुपद्रवी विचार असणार बहुतेक त्यावेळी. म्हणजे कसंय की ते नेमकं कारणदेखील मला आता आठवत नाही. पण कोणत्या का कारणाने असेना विराज परब हा आयडी आपण सुरू केला. आणि खर्या अर्थाने जिंदगीला चार चाँद लागले. त्याच्या आधी जीवन रटाळ होतं. आपण लॉगिन करायचो कोणाचा फोटो पाहायचो त्याला लाइक ठोकायचं. एखादी पोस्ट वाचायची न वाचायची आणि त्या पोस्टखाली कॉमेंट लिहायची सुपर्ब म्हणून! भेंचोद, पकाऊ आयुष्य होतं. लोकांच्या निरर्थक चर्चा ऐकायच्या, निरर्थक वाद विवाद ऐकायचे. आपण त्या चर्चा वाचतोय हे देखील कोणाला कळू द्यायचं नाही भेंचोद! हे काय जीवन होतं सालं!
विराज परब या आयडी मुळे आपल्यात एक वेगळीच हिम्मत आली. आपल्या आतला जायंट जागा झाला. द सीक्रेट या पुस्तकात खरंच म्हटलंय की आपल्या आत प्रचंड ताकद असते तिला ओळखले पाहिजे. टोनी रॉबिन्स म्हणतो अनलिश द जायंट विदिन. आपल्या आतला जायंट म्हणजे विराज परब हा आयडी. आता आपण मंजिरीच्या फोटोवर बिनधास लिहिलं की ‘हॉट अँड सेक्सी’ तर तिने आणि तिच्या नवर्याने लाइक ठोकलं. म्हणजे कसंय की एवढी हिम्मत मी माझ्या खर्याखुर्या प्रोफाइल वरुन केली असती का! शक्यच नाही. आणि कशी होणार हिम्मत. मंजिरीचं कॉलेजमधलं पहिलंचं वर्षं होतं आपण तेव्हा टीवायला होतो बहुतेक. आणि आपण तिला पाहिलं. बघताक्षणी आपण तिच्यावर फिदा. तरुणपणीची रग होतीच अंगात त्यात मित्रांनी भरीला घातलं. गेलो तिच्याजवळ नि बोललो, ‘तू खूप सुंदर दिसतेस.’ ती ज्याम बावरली. तिने तिच्या मैत्रिणीकडे बघितलं. पुन्हा माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यांत राग होता की भीती की गोंधळ मला काहीच कळलं नाही. आणि ती सुसाट पळत सुटली. कॉलेजच्या गेटमधनं बाहेर. दुसर्या दिवशी सकाळी आपण मित्रांसोबत चहाच्या टपरीवर सिगरेट फुंकत उभे. तर रस्त्याच्या पलीकडे ती उभी. आपल्याच दिशेने पाहत. क्षणभर छातीत धकधक अनुभवली. क्षणभरच. पुढच्याच क्षणात काही कळायच्या आत डोळ्यांपुढे काजवे चमकले. कांनातून सूSSईई असा आवाज येत होता. ‘पुन्हा तिच्या वाटेला लागू नकोस’ एवढंच ऐकलं. काय घडतंय हे कळायच्या आत ती रस्त्याच्या पलीकडून कोणाचा तरी हात पकडून जाताना दिसली. त्या दिवसानंतर आजपर्यन्त मंजिरीच काय दुसर्या कोणत्याही मुलीला आजवर ‘तू सुंदर दिसतेस’ असं सांगायची हिम्मत झाली नाही. आज विराज परब मुळे मी मंजिरीला ‘हॉट अँड सेक्सी’ अशी कॉम्प्लिमेंट दिली आणि विशेष म्हणजे तिलाही ते आवडलं. तिलाच नाही तिच्या नवर्यालादेखील विराज परबची कॉम्प्लिमेंट आवडली. माझ्या कानांतून सूSSईई असा आवाज ज्याने काढला होता तोच मंजिरीचा नवरा.
म्हणजे कसंय की इथे आपल्याला एक प्रकारची सुरक्षा असते. इथे आपल्या कानाखाली आवाज काढायला कोणी येवू शकणार नसतं. आपण वाटेल ती फिलॉसफी वाटेल त्या शब्दात इथे लिहू शकतो. आणि कोण आपलं झाटसुद्धा वाकडं करू शकणार नसते.
भेंचोद धर्माधिकारी! किती मेसेज पाठवतो सकाळपासून! आज कोणाला भोसडायचंय? खान! हम्म, आलं लक्षात. काल खानने केलेलं स्टेटमेंट! भेंचोद, यांना सांगतं कोण छानपट्टि चोदवायला! गप पीच्चर करा. शंभर करोड कमवा आणि बसा न शांत आपल्या बंगल्यात. भेंचोद! ज्या देशात राहता त्याच्याचविरोधात गरळ ओकतात साले. साल्यानो तुम्हाला इथे राहू देतो हे उपकार समजा ना! वर छानपट्टि काय शिकवताय आम्हाला! जे काय डायलॉग मारायचे ते पीच्चरमध्ये मारा. आम्ही छिटया मारू भेंचोद! भारी काम करता तुम्ही, आम्हाला कळतं. भारी अॅक्टिंग! आम्ही कुठे अमान्य करतो. त्यासाठीचतर तुम्हाला एवढे पैसे कमवून देतो ना. आमच्याच पैश्यात एशोआरामी जगा की. पण आमचेच पैसे कमवून गब्बर होता वर आमचीच गांड मारता. भेंचोद तुझा पोरगा इथे घाबरतो तर त्याला पाठव ना पाकिस्तानला. मी तिकीट काढून देतो हवं तर. बायकोलापण पाठव हवं तर. त्यांचा लौडा ज्याम मोठा असतो म्हणतात. तिलापण मजा येईल. पण इथे तुझी फालतू मतं कशाला बोंबलतो.
साला या धर्माधिकार्यालापण ना काडी कशी लावायची बरोबर माहीत. साला कुठून कुठून हे सारं शोधून काढतो. साले को मानना पडेगा. एकदम मादरचोद लौड्याचा आहे साला.
चला जास्त उशीर करून फायदा नाही. काय लिहायला सांगितलंय? हं… ‘हा बघा… हा कटेला आता आपल्याला शहाणपणा’… शहाणपणा नाही… शहाणपणा तुपट शब्द वाटतो. छानपट्टि! छानपट्टि खास वाटतो. ‘शिकवतोय’. शिकवतोय!… छे! ह्या धर्माधिकार्याला पण ना चांगले शब्द सुचत नाहीत साल्याला. शिकवतोय काय शिकवतोय. चोदतोय! चोदतोय कसं वाटतं. भेंचोद. आग लागली पाहिजे. सगळे कटेले मुंगळ्यासारखे जमा व्हायला पाहिजेत पोस्टवर. ‘छानपट्टि चोदतोय आणि हा सात वर्षापूर्वीचा फोटो पहा. ही तीच मशीद आहे ज्यात दोन वर्षांपूर्वी बॉम्ब बनवायचं साहित्य सापडलं होतं. आता लक्षात आलं का? ह्याच्या मुलाला आणि बायकोला इथे असुरक्षित का वाटतय?’ बस एवढंच. एवढंच टाकायचं. आणि शांत बसायचं. पुढचं धर्माधिकार्याकडून कळेलच.
हे जाम भारीये. हा नवीन खेळ खूपच मजा आणतो. जणूकाही युद्धच! आणि आपण सैनिक. म्हणजे आपण नाही स्वत:ला सैनिक समजत. आपल्याला त्या वर्तकने सांगितले. आपल्याला हे काम आवडले आणि ह्यात आपले काही नुकसान तर होत नाही मं काय हरकत आहे असे वाटले आणि सुरूवातीला मजा म्हणून आपण इथे अॅक्टीव झालो. हळूहळू मजा यायला लागली. आता हे युद्धं आपलं वाटायला लागलंय. हे युद्ध जिंकायचं. हे जाम भारीये!
2.
सुबेंदू फुक्या? हा… सुबेंदू फुक्याच. थांब, रिक्वेस्ट पाठवतो. विराज परबवरुन. त्याला कळणारच नाही की आपण आहोत म्हणून. हे जाम भारीये. आणि प्रजापतीलापण पाठवू रिक्वेस्ट. प्रजापती टकल्या. आणि तो सीबीआरईचा कोण तो. व्यंकी. आयला एवढ्या दिवसात आपल्या हे लक्षात नाही आलं कधी. ह्या तिघांना आता पीडता येईल येथून. ज्याम पीडलाय मला ह्या तिघांनी. साल्यांना डिसोझा जवळचा वाटायचा. तो पण साला गोड बोलण्यात एकदम माहिर. सुबेंदू सारंगी… थोडासा फुगलाय तेव्हापेक्षा. हा हाच! हे काय हातात सिगरेट आहे. हाच म्हणजे. बरा सापडला. चला फ्रेंड रिक्वेस्ट सेंट. आणि आता ह्याच्या फ्रेंड लिस्टीमध्ये प्रजापतीला शोधा. रा ज मो हन पी आर प्रजा हा आला. आहे फ्रेंडलिस्टमध्ये. चला ह्याला पण पाठवा फ्रेंड रिक्वेस्ट. दोघांना रिक्वेस्टी पाठवून झाल्यात. व्यंकीला पाठवायला पाहिजे पण त्याचं पूर्ण नाव आपल्याला माहीत नाहीये. ह्यांच्या फ्रेंडलिस्टिमध्ये बघूया का? व्यंकटेश टाकून बघू. व्यं क टे श… व्यंकटेश… नाही. नाही सापडत. व्यंकी नाही सापडला. सापडला असता पण आपल्याला त्याचं आडनाव नाही माहीत. व्यंकटेश. एवढंच माहीत सालं. तो बॉस. त्याला कोण विचारणार तुझं आडनाव काय म्हणून. कधी तशी वेळच आली नाही. आपण नेहमी नाईटला. तो यायचा कधी कधी रात्री विजिटला. पण फार भेट व्हायची नाही. तो डिसोझा साला नेहमी जनरललाच असायचा. साल्याला पाना नीट पकडता येत नाही. साधी अर्थिंगची वायर ओळखता येत नव्हती साल्याला. पण दिवसभर व्यंकीचे चोळायचा ना! व्यंकीपण खुश भेंचोद. त्यामुळे सुबेंदूला डिसोझा जनरललाच पाहिजे होता. डिसोझा जनरलला असला म्हणजे साला व्यंकीकडून कम्प्लेंटला चान्सच नाही. एकदा साला चुकून आपण जनरलला होतो तर काय हंगामा. साला त्याच दिवशी नेमका डायकीनचा आऊटडोर प्लांट बंद पडला. परेरा साला फुद्दू निघाला. एसी मेकॅनिकचा त्याला काय झाटा का फाटा कळत नाय. आणि व्यंकीला साल्याला एसीवाल्याचं आणि इलेक्ट्रिकवाल्याचं काम वेगवेगळं असतं हे माहीत नाही भेंचोद. तो सुद्धा साला मलाच भोसडायला लागला. इथे आपल्या हिन्दीचे वांदे. त्यात त्याला हिन्दी झाट समजत नाय. भेंचोद इंग्लिशमध्ये बडबडला कायतरी. मी मोडक्या तोडक्या हिंदीत समजवतोय, अरे सर, वो मई गया था उपर टेरेस पे. मईने चेक किया. तो वो. मतलब ए इलेक्ट्रिक का प्रॉब्लेम नही है. ए उसका डायकिन का आऊटडोर प्लांट मे कुछ तो इश्यू है सर. परेरा चेक कर रहा था.
तो तुम यहा क्यु आया. वहा फ्लोर पे देखा पुरा लोग पसीना-पसीना हो गया. उपर जाओ स्टुपिड
सर मई अभी उपर जाके ही आया… परेरा बोला की डायकिन वालो को फोन करना पडेगा करके. इसके लीये मई नीचे आया सर
चुतीया मत समजाव मेरे को. कंपनी ने मोबाइल नही दिया तुमको? अबी फोन करू क्या प्रजापती को.
सर मोबाइल का बिल नही भरा करके वो बंद है
बिल नही भरा? तो क्या मई जाके भरू क्या प्रजापती को बोलने का.
प्रजापतीको मईने… मतलब डिसोझाने बताया था तो उन्होने बोला की सीबीआरीसे पैसा नही आया करके लास्ट मंथका, तो आपका बिल पैसा आनेके बाद भरेगा करके बोला. तबतक व्यंकी… मतलब… सॉरी सर… सर के केबिनका फोन इस्तेमाल करो करके बोले. इसलीये मई यहा आया.
चलो अबी टाईमपास मत कर्र. फोन कर्र डायकीन वालो को और आधा घंटा मे इदर्र आने को बोलने का ऊनको.
यस सर
प्रजापतीचा एवढा राग आलेला त्या दिवशी. भेंचोद, बिझनेस करता, एवढ्या मोठ्या कॉलसेंटरला सर्विस देता आणि मोबाइलचं बिल भरायला पैशे नाहीत! मुलींना अंगाखाली झोपवायला पैशे आहेत. कांदीवलीच्या ऑफिसमध्ये नुसता हैदोस तमाशा करायला पैशे आहेत. सिगरेटी ओढायला पैशे आहेत. ऑफिसमध्ये तंदुरी हादडायला पैशे आहेत. पण साइटवरच्या मोबाइलचे बिल भरायला पैशे नाहीत. जाऊदे आपल्याला काय त्याचं. त्यांचा बिझनेस ते जाणोत कसा करायचा असा विचार करून त्यावेळेस गप बसलो.
एकदा साला व्यंकी रात्री आला केबिन मध्ये. मी केबिनची लाईट बंद करून एक खुर्ची समोर ठेवून तिच्यावर पाय ताणून देवून डोळ्यावर रुमाल ठेऊन झोपलेलो मस्त. झोपलेलो म्हणजे काय दोन-अडीच तरी वाजले होते तेव्हा, मग झोपणारच ना. अकरा वाजता माझी नाइटशिफ्ट सुरू होते. मी साडेदहालाच हजर होतो. सुशांत नेहमीप्रमाणे सेकंड शिफ्टला असतो त्याला सोडतो. आणि मग नेहमीप्रमाणे दोन्ही फ्लोरवर एकदा चक्कर मारायची. सगळे सीपीयू युनिट्स चेक करायचे. मग अर्धातास हाऊसकीपिंगच्या फरेरासोबत इकडच्या तिकडच्या फालतू गप्पा. हा फरेरा म्हणजे गोव्यातला आणि तो एसीमेकॅनिक परेरा म्हणजे वसईतला. तर हा फरेरा मला कोणाची कुठे काय लफडी कोण कोणत्या केबिनमध्ये कोणाला कधी लावतो सगळं वर्णन करून सांगणार. मग मी आपला साडेअकरा-बारापर्यन्त व्यंकीच्या केबिनमध्ये. व्यंकीचं कम्प्युटर सुरू करायचं. सीडी टाकायची. पिच्चर पाहायचा एक तासभर. मग पुन्हा चक्कर मारायची. दीड-पावणेदोनला दोन खुर्च्या समोरासमोर मांडून एका खुर्चीवर पाय लांबवून, झोपून जायचं. हे माझं रोजचं रुटीन. तर त्यादिवशीसुद्धा मी रुटीनप्रमाणे झोपलो होतो. आणि हा अडीचच्या दरम्यान हजर. तरी मला झोपेत दरवाजा उघडल्याचा आवाज आला. पण साला झोपेत वाटलं मुरगेसन असेल म्हणून झोपून राहिलो. दोनेक सेकंद झाली असतील आणि माझी बुडाखालची खुर्ची हादरली. साल्या मुरगेसनला झालं काय म्हणून वैतागून डोळे उघडले तर समोर व्यंकी. हा साला काय करतोय इथे ह्या वेळी.
बेंचो तू इदर सोया है. उदर फ्लोरवाला लडका-लडकी सोया है.
सर… सॉरी मतलब… ऐसेही आंख लग गयी.
च्यायला हा आता कोणाला फोन लावतोय. सुबेंदूला? की प्रजापतीला? जावूदे. पहिलं लफडं काय झालं ते समझलं पाहिजे.
सुबेंदू, कीदर है तू?
बेडमे? बेडमे बेंचो… अरे सुबेंदू तू बेडमे है मुझे पता है… तू कांदिवली है की दिल्ली मे साले?
दिल्ली मे क्या प्रजापती को गांड दे रहा है?
क्या? बहेन की शादी? अबी बेंचो यहा अपनी शादी होनेवाली है… सीबीआरी के साथ तेरा बी बोरिया-बिस्तरा उठेगा… और तू वहा एक्स-गलफ्रेंड की शादी मे नाच रहा है बेंचो.
हुवा कुछ नही… ये जो तेरा दिनकर है ना… ओ साला पनौती है. ओ जिस शिफ्ट मे रहेगा साला कुछ न कुछ कांड होता ई है.
यहा फ्लोरवाले फकर्स ट्रेनिंग रूम मे घुसके चुम्मा-चाटी कर्रे थे… बेंचो अपना बंदा यहा पे सो र्रा था.
अरे… मॅनेज? सुबेंदू… नायर आनेवाला है सुभे यहा पे. पाठक, अधिकारी सब रहेंगे पता तुमको. पिछले एक म्हैने मे तीन बार लफडा हुवा अपनी तरफ से..
तू प्रजापती को बोल. अब मै देखता हू. क्या करू. रख फोन.
ए दिनकर एक काम कर
हा सर?
वो फूटेज लगा. साऊथ फ्लोर के बाजूवाला ट्रेनिंग रूम. जॅस्मिन लर्निंग स्पेस. देड-पौनेदो के बीच मे.
हा सर, लगाता हू…
मेनू. रेकोर्डेड. एसटेन.
एसटेन की एलेवेन. कॅमेराचे नंबर पण आठवत नाहीत टायमाला. एसटेनच बहुतेक
एसटेन. टाइम 1:00 AM 2:00 AM. प्ले.
हा सर… अबी लगेगा.
साला काय लफडा झाला ते फरेराला माहीत असणार. पण आता काय फायदा. जे लफडं व्हायचं ते तर झालंच. ही कुठे चालली? फरेराची हिरोईन. फरेरा ज्या शिफ्टला त्या शिफ्टला ही. साला कॉम्बिनेशन भारीये. ट्रेनिंग रूम कशाला उघडतीये ही आता. रात्रिची कसली ट्रेनिंग रूम साफ करतेय ही. आणि हातात तर काय दिसत नाहीये.
सर क्या हूआ? मतलब…
दिनकर, मै तुझे बताऊ, क्या हूआ!
नही सर… सॉरी नेक्स्टाइम ऐसा नही होंगा.
ए जो लेडी वहा ट्रेनिंग रूम मे गयी ऊनका नाम क्या है?
पता नही… राणी करके बुलाते है उसे. ए फरेरा के साथ…
हा उतना तो पता है मुझे… हाऊसकीपिंग मे है वो.
क्या झाटा पता है तेरेको. फरेरा उसको रोज लगाता है, तेरेको पता है?
हा सर हाऊसकीपिंग मे है वो. वो फरेरा को बुलाऊ क्या?
…
भेंचोद… कम से कम नही असं तरी बोल.
वो थोडा बॅकवर्ड जा..
हा सर
बॅकबॅकबॅकबॅकबॅकबॅक कौनसे टाइम पे जाऊ सर?
बस और थोडा पिछे.
बॅकबॅक
बसबसबस
ए अभी उस रूम मे क्यु गयी? वैक्युम तो सुभे स्केडुल रहेता है. उसके हाथ मे भी कुछ नही है. टाइम क्या है?
सर एक बजकर शे मिनिट है
चलो आगे देखते है.
फॉरवर्ड करू?
हा लेकीन आइस्ता.
फॉरवर्डफॉरवर्डफॉरवर्ड
बस बस बस… वो बाहर आई. वो एक बजकर शे को अंदर गयी और आठ को बाहर. दरवाजा लॉक किये बिना चली गयी?
ठीक है एक काम कर फरेरा को बुला… फरेरा है ना नाइट मे की सावंत है?
फरेरा है सर.
बुला उसको.
भेंचोद फरेराचे लवडे लागले आता. पॅंट्री मध्ये असेल आता.
हे काय साला ह्या लॉबीमध्ये काळोख का आहे. इथला एलिडी गेला का? हा बदलला पाहिजे. उद्या फस्शीपला कोण येईल त्याला सांगायला हवं. रोहन असेल कदाचित. त्याला सांगू. सकाळी सकाळी बदलून होईल पटकन. दोन मिनिटांच तर काम आहे.
हे काय इथे पॅंट्रीमध्येपण मीटिंग भरलीये! म्हणजे लफडं झालंय ते अख्ख्या दुनियेला महितिये आणि आपल्यालाच माहीत नाहीये भेंचोद!
फरेरा, व्यंकी बुलाया तुझे…
देखा, आप लोगो की वजह से अभी मै सुनुंगा वहा पे. ए चव्हाण… एक मिनिट इदर आ ना.
बोल
क्या हुवा क्या है?
अरे फरेरा सगळ्या दुनियेची लफडी तुम्ही मला सांगता आणि आज तुमीच मला विचारा क्या हुआ करके.
नही नही. बता ना. मराठे का फोन था. क्या हूआ पुछ रहा था… अब मै क्या बोलू ऊनको? मुझे तो कुछ पता नही. बाद मे सावंत का भी फोन आया.
पता नही लेकीन जॅस्मिन मे कुछ हुवा. होने के पैले तेरी एक लेडी उस रूम मे गयी थी. गयी और तुरंत वापस आई.
फक्ट्प. कौन… राणी?
हा वो ही…
चलने का क्या?
वुई हॅव्टू भेंचोद.
चलो फिर.
फरेरा साला डुक्कर खाऊन खाऊन डुकरासारखाच चालायला लागलाय. मान थोडी खाली वाकवून पुढे झुकवलेली. सिगरेट पिऊन काळे पडलेले आणि थोडे पुढे आलेले ओठ. डोक्यावर निळी टोपी. आणि दोन्ही पाय एकमेकांत अडखळल्यासारखं चालणं. अख्खा डुक्कर आहे साला. डुक्करखावू साला. आठवड्यातून तीन दिवस तरी डुक्कर खातो. डेशिफ्टला असला की दुपारच्या जेवणासाठी हमखास डुकराचं मटन असणारच!
वो सीसीटीविमे कुछ दिखा क्या?
अरे पता नही रे. तेरी वो छमिया देखी एक सवाएक के बीच मे. उसने जॅस्मिन खोला. अंदर गयी और दो मिनिट मे बाहर आयी.
वो मुझे मरवायेगी साली.
बाद मे मुझे व्यंकी ने तुझे बुलाने के लीये भेजा.
मे आय…
येस येस, फरेरा कमीन. प्लीज क्लोज द डोर.
दिनकर वो एक बजकर बाईस मिनिट पर लगाओ.
हा सर लगाता हू.
नाऊ टेल मी फरेरा, व्हेर वॉज राणीज ड्यूटी टूडे?
राणी? शी मस्ट बी अॅट नॉर्थ फ्लोर टूडे. इज देर एनी प्रॉ…
आ यू शो
येस सर. आय मायसेल्फ प्लेस्ड हर देर फॉर धिस वीक. एव्री वीक वुई चेंज देअर प्लेस!
सर हा ए आया एक बजकर बाईस मिनिट… कोई दो जन अंदर जॅस्मिन मे जा रहे है.
ओके. पॉज इट. सो टेल मी देन, फरेरा! व्हॉट वॉज शी डूइंग देअर अॅट जॅस्मिन?
सर सॉरी… आय अॅम नॉट गेटिंग.
सी फरेरा. यू आर गोइंग टु बी स्क्रिव्ड अप अलटीमेटली अॅज यू आर शिफ्ट इन्चार्ज. यू नो दॅट नोवन इज अलावूड टु ओपन द ट्रेनिंग रूम्स अॅट नाइट. नॉट ईवन मी. राइट?
येस सर आय नो दॅट.
देन व्हाय द फक राणी ओपन्ड जॅस्मिन?
सर आय रियली डोन्ट नो सर. नोवन आस्क्ड हर टू ओपन द रूम टूडे. अँड हर प्लेस टूडे वॉज नॉट साऊथ. शी मस्ट बी इन नॉर्थ फ्लोर.
यस, बट द कॅमेरा सेज शी वॉज अॅट जॅस्मिन अराऊंड वनोक्लॉक.
सर… आई मीन… आय नीड टु चेक… आय मीन आईल आस्क हर व्हॉट शी वॉज डूइंग देर…
नो. यू नीड नॉट आस्क हर. आईल टेल यू. शी वॉज डूइंग सोशल वर्क. बाय हेल्पींग द रोमिओ अँड द ज्युलिएट टु फक… आय मीन टु मेक लव. शी जस्ट अरेंज्ड एवरीथींग सो दॅट द कपल शुड फील लाइक दे आर इन बाली.
नो सर… आय अॅम…
यू नो, जॅस्मिन इज द हनिमून डेस्टीनेशन इन शक्ति इ-सर्विसेस. धिस इज द थर्ड टाइम इन लास्ट वन मंथ दॅट पीपल आर सीन इन डॉग पोझिशन देर इन दॅट रूम बेंचो.
सर आईल गिव्ह हर ए मेमो…
मेमो?… वो क्या होता है फरेरा? आयम गोइंग टु गेट बंबू टुमारो और तू उसको मेमो देके छोड देगा क्या! कल से वो यहा पे नही आयेगी. अँड अबाऊट यू मराठे विल डीसाईड व्हॉट टु डू.
3.
ज्याम भारी लफडं झालेलं भेंचोद. फरेरा ची बदली. राणीला डीच्चू. आणि माझ्या जागी हनिफची वर्णी. झोपलो होतो म्हणून. अॅक्चुअली व्यंकीला माझ्यावर राग होता. त्याला वाटत होतं माझ्यामुळे सगळी लफडी होतात. आणि हनिफ साला त्याच दिवशी सकाळी बदकासारखा चालत चालत आला. झालं. व्यंकीने हनिफला माझ्या जागेवर आणलं आणि हनिफ जिथे काम करत होता तिथे मला पाठवलं. एकदम वेडझवगिरी. साइटवर अजून काम सुरू होतं. म्हणजे कायम जनरल शिफ्ट आणि दुनियाभरचं काम. आणि नाकातोंडात धूळ. आणि भेंचोद न संपणारे ड्रिलचे, ग्राईंडरचे, वेल्डिंग करतानाचे आवाज. जणू आवाजाचा अख्खा कंटेनर आपल्या कानात कोणीतरी सतत ओतत आहे.
ते जावूदे, नवीन साईटवर सगळ्यात वैताग आणणारी गोष्ट कोणती माहितीये? सोराब. सगळेजन त्याला सोराबभाई म्हणायचे. मी सोराब. सोराबला सोराबभाई म्हणण्यात काही पॉइंटच नव्हता. त्याच्या अंगाला कसलातरी विचित्र वास यायचा. म्हणजे तो आपल्या बाजूने गेला की तो विशिष्ट वास आपल्या नाकात घुसायचा. वाटायचं नाक कापून फेकून द्यावं आपलं म्हणजे असले वास घेण्याची नौबतच येणार नाही आपल्यावर. त्याचे कुरळे केस बारा महीने चोवीस तास घामाने भिजलेले. ओठांच्या दोन्ही बाजूच्या कोपर्यात थुंकी जमा. सतत. बोलताना बहुतेक तोंडातल्या तोंडात थुंकी आणि शब्द यांच्यात तुंबळ युद्ध होवून शेवटी थुंकीबंबाळ शब्द बाहेर पडायचे. वाटायचं त्या शब्दांबरोबर त्या शब्दांना चिकटलेली थुंकीसुद्धा आपल्या कानात जातेय की काय. चेक्सचा शर्ट घामाने भिजलेला. त्यात तो शर्टची वरची दोन बटणं कायम उघडी ठेवायचा. घामाने निथळणार्या छातीचं प्रदर्शन करीत. अशा माणसाला सोराबभाई म्हणण्यात काय पॉइंट होता. मी त्याला सोराब म्हणायचो.
सीबीआरइची सगळी नवीन प्रोजेक्टस याच्या अंडर असायची. म्हणजे हा साईट सुपरवायजर. अख्खा दिवस फ्लोरभर नाचत राहणार. थुंकीमिश्रित शब्दांमुळे तो काय बोलायचा ते बर्याचदा कोणाला कळायचं नाही. तरी सगळे जी जी करत समजल्याचा आव आणायचे. पण साल्याची नजर एकदम बारीक. कामातली चूक तो नेमकी हेरयाचा. जणू काही त्याच्या डोळ्यांत एक सूक्ष्म स्कॅनर बसवलेला असावा आणि कामावर एक नजर फिरवली की पिपपीपपिप आवाज करत ते स्कॅनर कामातली चूक त्याला दाखवून देत असणार. त्यामुळे सगळे त्याला टरकुन असायचे. भेंचोद कॉन्ट्रॅक्टर पासून व्हेंडरपर्यन्त सगळे सोराबजी… सोराबजी! लाळघोटे साले.
लोकांच्या या लाळघोटेपणाचा फायदा न घेता तर तो सोराब कसला! भेंचोद लाजोला त्याने ज्याम पीदवलं. लाजो रोज संध्याकाळी साडेआठ वाजता चहा घेवून फ्लोरवर यायची. बेसमेंटला तिच्या नवर्याची चहाची टपरी होती. दिवसभर यकीम चहा घेवून यायचा, मात्र संध्याकाळी साडेआठचा चहा न चुकता लाजो घेवून यायची. ओवरटाइम काम करण्यार्या कारपेंटर्सना चहा देऊन झाला की ती साऊथ फ्लोरच्या पॅंट्रीच्या इथे जाणार. सोराब आधीपासूनच तिथे बसलेला असणार. मग ती त्याला चहा देणार. तो सावकाश लाजोकडे पाहत चहा पिणार आणि चहा पिऊन झाला की पॅंट्रीच्या मागच्या बाजूलाच असलेल्या टॉयलेटमध्ये अमोनियाच्या परमघमघमाटात सोराब आणि लाजो यांचा नितांत किळसवाना रोमान्स. घामाची देवाणघेवाण याव्यतिरिक्त या रोमान्समध्ये काय रोमॅंटिक असणार असा प्रश्न मला पहिल्यांदा त्यांच्या रोमान्सबद्दल कळलं तेव्हा पडला होता. याच टॉयलेटमधल्या अमोनियाच्या परमघमघमाटात मुतत असताना सोराब-लाजोची रोमान्सकहाणी मला पांडेने ऐकवली. मूतण्यासाठी जितका वेळ लागतो तितक्या वेळात त्याने ही कहाणी सांगून संपवली, कानाला गुंडाळलेलं जानवे काढलं आणि बाहेर पडला. त्याच्यापाठोपाठ मी. माझ्या मनात सोराबविषयीची किळस शिगोशिग भरून राहिली. त्या दिवसापासून लाजोच्या नवर्याच्या टपरीवरचा चहा पिणे मी सोडूनच दिले. सोराबचा घाम व्हाया लाजो तिच्या नवर्याने बनवलेल्या चहामधून माझ्या पोटात जाईल कि काय अशी भीती मला वाटली असावी.
भेंचोद, नोटिफिकेशन्सचा पाउस सुरू आहे मोबाइलवर म्हणजे कटेले आले वाटते पोस्टवर. पाहूया का. नको काय पाहायचं तेच ते. आर्गुमेंटमध्ये घुसायचं हे आपलं काम नाही. फक्त काडी लावायची एवढंच.