तंत्रज्ञान व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
- प्रियल डाबरे, भुईगाव
२०२० साली भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले. शिक्षणविषयक पारंपारिक धारणा आणि पद्धती याबाबत फेरविचार करून त्यात सुधारणा घडवून आणावी या उद्देशाने हे नवीन धोरण बनविण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या अंगभूत कौशल्याला चालना मिळावी, तसेच त्या कौशल्याच्या विकासाला शिक्षणातून वाव मिळावा अशाप्रकारच्या सुधारणा सादर धोरणात सुचविण्यात आल्या आहेत. हे धोरण चार विभागात विभागलेले आहे.
भाग १- शालेय शिक्षण,
भाग २- उच्च शिक्षण,
भाग ३- इतर महत्त्वाचे शिक्षणासंदर्भातील मुद्दे,
भाग ४- अंमलबजावणी.
पहिल्या दोन भागांमध्ये शालेय शिक्षण कशाप्रकारे हवे व त्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत त्याविषयी माहिती दिली गेली आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूळ पाया जो आहे शिक्षण पद्धतीचा तो म्हणजे शिक्षक त्याविषयी म्हणजेच त्यांनी अध्ययन कशाप्रकारे करावे व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे ह्या विषयी काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. शिक्षक व पालक यांनी एकत्र येऊन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजेच वर्गामध्ये आणि वर्गाच्या बाहेर मुलांना कशाप्रकारे मदत करता येईल याविषयी योजना करण्याचे सुचवले आहे.
येणार्या काळात तंत्रज्ञांनाचा होणारा विकास लक्षात घेता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित प्रणाली शाळा अथवा संस्थेने वापरात आणावी; जेणेकरून या धोरणात सुचविण्यात आल्याप्रमाणे त्यांना तंत्रज्ञानाची जोड मिळेल असे संकेत या धोरणात देण्यात आले आहेत. यामागचा उद्देश हा की, मुलांचा सर्वांगीण विकासाचं उद्दीष्ट साध्य करताना तंत्रज्ञान ही निश्चितपणे निर्णायक आणि महत्वाची भूमिका बजावेल. तिसऱ्या व चौथ्या भागांमध्ये मुलांना व्यवसायिक शिक्षण तसेच साक्षरता व भारतीय भाषा कला व संस्कृतीला प्रोत्साहन दिनाविषयी सुचविण्यात आले आहे. तसेच हे सर्व साध्य करताना अर्थ पुरवठा कसा करावा, म्हणजेच केंद्रीय व राज्य सरकार ह्या सर्वांमध्ये कसा वाटला याविषयी सुचविण्यात आले आहे. जेणेकरून सर्वांना परवडण्याजोगे व गुणवत्ताना धरून शिक्षण देता येईल त्यात जोडीला प्रकर्षाने जे नमूद केले आहे ते म्हणजे तंत्रज्ञान व त्याचा वापर त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे नॅशनल एज्युकेशनल टेक्निकल फोरम शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराला आणि एकात्मिक कारणाला पाठिंबा देऊन त्याचा अवलंब केला जाईल व तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शाळा आणि उच्च शिक्षण या दोन्हीतील अध्ययन मूल्यांकन नियोजन व प्रशासन इत्यादींची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होईल.
वरील सर्व बाबी लक्षात घेता एकंदर नवीन शिक्षण धोरण बनवण्याविषयीची धारणा हीच नवीन तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे किंवा त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिक्षण घेता यावं व त्यांना त्यांचा मार्ग निवडता यावा हे एकमेव उद्दिष्ट असल्याचे दिसून येते. तंत्रज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर हा मनुष्याच्या जीवनातला एक महत्वाचा भाग आहे व त्याचा वापर आपल्या सोयीसाठी व व चांगल्या पद्धतीने करणे ही आपली जबाबदारी आहे. बदल हा नेहमी कायम असतो आणि बदल घडवत राहणे ही काळाची गरज असते. नवीन नवीन तंत्रज्ञान येणे व ते आत्मसात करणे ही कदाचित सुरुवातीला कसोटीची वाटत असेल परंतु त्याची उपयुक्तता समजून घेतली तर ती आपल्या फायद्याचीच ठरेल त्यामुळे जर आपण इथे शिक्षण व तंत्रज्ञान यासंदर्भात जर बोलत असू तर तर शिक्षक यामध्ये फार मोलाची भूमिका बजावू शकतात. शिक्षकांनी जर तंत्रज्ञान आत्मसात केले आणि त्याचा वापर करण्यास सुरुवात केली तर त्यांना याचा वापर त्यांचे शिक्षण शैली सुधारण्यासाठी किंवा अधिक प्रभावी करण्यासाठी वापरता येईल. पर्यायाने त्याचा वापर मुलांना उपयुक्त व कालसुसंगत शिक्षण देता येईल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की तंत्रज्ञान मुळात माणसाने माणसाच्याच प्रगतीसाठी बनविलेले साधन आहे आणि त्याचा वापर करणे ही तशी काळाची गरजच आहे. तसेच या तंत्रज्ञानामुळे खूपशा गोष्टी अशा सोप्या झाल्या आहेत बरीचशी नवनवीन साधने यामुळे उपलब्ध झालेली आहेत आणि मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांचा आपल्याला वापर करता येतो. उदाहरणार्थ डिजिटल क्लासरूम. डिजिटल क्लासरूम मध्ये देखील बऱ्याचशा बदल झालेला आहे मेडिकल सायन्स प्रमाणे जे आपण बघतो ते आपल्या जास्त वेळ स्मरणात राहते या तत्वाचा वापर या डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून होतो.
आता हे झालं मुलांच्या बाबतीत तसेच एखादी संस्था चालवणे ही देखील तितकीच महत्त्वाची आणि जिकिरीची बाब आहे. संस्था चालवत असताना जे पूर्व पार प्रमाणे चालत आलेला आहे तसेच आपल्याला मानवी संसाधनावर अवलंबून राहावं लागत होत. आणि त्यामध्ये बरेचसे मानवी चुका देखील होतात आणि त्या चुका कधी कधी महागात देखील पडू शकतात परंतु जर आपण तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्या चुकांना आपण कमी किंवा पूर्णपणे काढून टाकू शकतो आता हे सर्व करताना आपल्याला मानवी संचालक संसाधनाची गरज लागणार आहे का तर हो ती तर लागणारच परंतु त्या चुका होत्या त्याला आपण आळा घालू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञान कुठल्याही बाबतीमध्ये सीमित नाही आहे तर तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या सुविधेसाठी करता येऊ शकतो. एकूणच जर आपण याचा वापर केला तर आपण आपला वेळ, संसाधन आणि इतर ज्या गोष्टी च्या एखाद्या संस्था चालवण्यासाठी किंवा मुलांना शिकवण्यासाठी लागतात त्या अतिशय प्रभावी रित्या उपयोगात आणू शकतो.
नवीन शिक्षण पद्धती नुसार आपल्या शाळेमध्ये काही बदल करणे जरुरीचे आहे त्याचे कारण देखील तसेच आहे म्हणजे जेव्हा हे आपण स्वतः अंगिकारू तेव्हा त्याचे नक्कीच चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील. सुरुवातीला ह्याच्या implementation मध्ये कदाचित काही अडथळे किंवा roadblock येतील परंतु जर आपण ह्या अडथळ्याला झुगारून जेव्हा आपण हे implement करू तेव्हा त्याचा खूप फायदा आपल्याला तसेच आपल्या येणाऱ्या पिढीला होणार आहे.
सर्वप्रथम शाळेच्या व्यवस्थापनाने ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग समजून घेणे गरचेचे आहे. जेणेकरून ते त्यांच्या शिक्षकांना download करू शकतील आणि पर्यायाने ते त्यांच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहाचवण्यास सोपे जाईल.
तंत्रज्ञान व परंपरागत शिक्षण पद्धती यांची सांगड घालने खूप महत्त्वाचे आहे व यामधून विद्यार्थ्यांची बौद्धिक शारीरिक व मानसिक वाढ योग्य त्या प्रकारे होण्यास मदत होते आणि ह्यामुळे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होते. जसे योग्य तो बदल योग्य त्यावेळी होणे गरजेचे असते त्यानुसार काही बदल शिक्षण पद्धतीमध्ये वेळोवेळी होत असतात व त्याप्रमाणे काही नियम लागू होत असतात तसाच एक बदल किंवा आपण त्याला नवीन पायंडा म्हणू शकतो credit assessment report किंवा cumulative record report हे नवीन शिक्षण पद्धतीचा भाग पुढे जाऊन होऊ शकतो ज्या मधून आपल्याला विद्यार्थ्यांचा कल समजण्यास मदत होईल आता विद्यार्थ्यांचा कल म्हणजे काय असू शकतो तर जो विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत आहे त्या विद्यार्थ्यांचा लहानपणापासून तर अगदी दहावीपर्यंतचा काळ कोणत्या गोष्टींमध्ये आहे तो ठरवणं या रिपोर्टमधून सोपं जाणार आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्याला किंवा त्याच्या पालकांना त्याला कुठल्या गोष्टींमध्ये गोडी आहे कुठल्या गोष्टींमध्ये तो काय करू शकतो हे समजणे खूप सोपे जाणार आहे तर अगदी पहिलीपासून तर इयत्ता दहावी पर्यंत याची नोंद ठेवणे कदाचित भविष्यामध्ये अनिवार्य होऊ शकेल एका दृष्टीने हे कदाचित अतिरिक्त काम आहे असे वाटू शकेल परंतु जर आपण ह्याला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बघितलं तर हे अगदी त्यांच्या फायद्याचे ठरणार आहे आणि हे देखील आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने सोपं करू शकतो जेणेकरून जे काही आपण करतोय त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे राहील तो रेकॉर्ड ठेवणं आपल्यासाठी कठीण राहणार नाही व त्यामुळे कदाचित आपली शिक्षण पद्धतीमध्ये आणखी सुधारणा करू शकू. जर वरील बाबी आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला दिसून येईल की जरी आपण या तंत्रज्ञान युगात असू तरी देखील आपल्याला परंपरागत शिक्षण पद्धती व तंत्रज्ञान यांचे सांगड घालावी लागेल जेणेकरून आपण शिक्षक म्हणून व संस्था म्हणून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी, भविष्याच्या दृष्टीने त्यांना तयार करण्यासाठी आपण आपली शैक्षणिक प्रक्रिया राबवू शकू.