‘तूतिचे ते झाड’
अंगनातल्या तूतिच्या झुडपाकडे पाहून
सांगितले सहज त्याला एक मनचे गूज
किती रे सुंदर सुखी डौलदार तू
रंगिबेरंगी फुलपाखरे रोज येतात कुशीत
पाहूनचाराला, बाळंतपणाला अन् आश्रयाला.
तरी मौन त्याचे भंगले नाही.
इतक्यात आली एक धुव्वाधार वर्षासर
खळकन पडले गळून एक पिकले पान
तेव्हा कळाले मर्म जीवनाचे
सुखचित्राचे भ्रम सारे त्या पानासवे गळाले.
- सबिना सांतान थॉमस फोस, गास
भ्रमणध्वनी क्र. : 84469 01602