तिची आई
त्याची आई,तिची आई सेम
पण त्यांच्या आईचा होतो गेम
ती कुठे असेल याचा नाही नेम
नातवंडं वाढवताना तिचा क्लेम
तिची आई आता खूप थकते
म्हातारी होण्याआधी वाकते
लेक तिच्यासाठी करूणा भाकते
सासु मात्र उसासे टाकते
बिछाना धरताच टेन्शन येते
कशाला तडमडता,बोलणी खाते
तिच्या आईसाठी घालमेल होते
विचारात पडते,ती रडते
आजारी होताच,ती धडपडते
जिवापाड जपते,बडबडते
घरच्या सेवेत गडबडते
घरची जग सोडते, तेव्हा जागते
देवाकडे मगं माफी मागते
लेकाला कळते ही कशी वागते
तिच्या आईतच तो विसरतो
कर्तव्य चुकतो,मायला मूकतो
गेल्यावर मात्र नुसता भुंकतो
माय मरते,ती आईसाठी झुरते
खुप कळलं
नोकरी नंतर पगार झाला
हप्ता कापून हाती आला
कधी संपेल काळ वाढला
खुप कळलं,हा शत्रु धाडला
पूर्ण पगार नाही घेतला
कधी घराच होई कर्ज
फिरणे तर होते वर्ज्य
मुलं मोठी करताना थकलो
आवडी निवडीला आळा
शिक्षणासाठी घाम गाळा
कमविता झाला रे बाळा
लग्नात हातभार निती पाळा
सुनेची सेवा थोडी करा
आजी होण्याची आस धरा
थकलो तरी नातवंडासाठी मरा
बाप म्हणजे डोक्याला ताप
आई किती देते रे मनस्ताप
सुन म्हणे नको हा व्याप
मी कशी पोसू तुझे मायबाप
पोरासाठी नवं घर घेतलं
कर्ज माझ्या जिवावर बेतलं
अजुन माया ,लोभ दिसतो
रिटायर झालो अजून फसतो
कुंपणच शेत खाते,मी हसतो
कारण मी बाप,असतो
- शकुंतला नारायण पाटील, नवाळे