बटण
- महेश लीलापंडित
एक आता थोड्यावेळापूर्वी बॅचलरी
आनंदा पर्यंत
मी दिलदार यारों का यार
लग्न झालं माझ्या
खिशांना डोळे
वाळीत पडलेलं जातीबाहेर
काढलेलं आत्ता थोड्यावेळापूर्वी बॅचलरी
आनंदा पर्यंतचं
वैतागवाडी बटन खिशाचं
स्वच्छ सवर्ण आपलसं वाटू लागलं
आणि वापर
कांदिवली ऐवजी बोरीवली
दोन उतरलो दोघे मुद्दाम
एक स्टेशन पुढे
लोकलमधनं
बोरीवली ते कांदिवली
मीटर प्रमाणे रिक्षा
अनईकॉनॉमिकल रोमॅटिसीझमात
खिशाच्या बटनाविषयी कॉन्शीअस
तीन काढावं म्हटलं सर्दी
ताप, डोके दुःखी
दात कंबर अंगदुःखी
अंगावरच
रडते बायको
“मी आजारी पडल्यावर थोडं काही झाल्यावर मग कशाला नेता दवाखान्यात मला लगेच ?”
चार “ए चल अरे फक्त चहा आनि वडापाव चारव”
चल हॉटेलमध्ये लंच दे
नो नो नो नो
यार नाही आवडत मला
खायला बाहेरचं
काय वडापाव
चल घरी पोहे खा
चहा पी
तू ये रात्री जेवायला
पाच “अहो काय भाजी आणायची ?”
भाजी नको डाळच कर रोज रोज ?
सहा मगं बाहेर जाऊया चल मुव्ही, सिंहगड
अ) नको आपण इथेच गप्पा करू
ब) नंतर कधीतरी
क) कैलासच्या रूमवर
ड) योगिताकडे
(बटण)
सात अहो कुठंतरी बाहेर जाऊया का तुळशीबाग ?…. मुव्ही
अ) नको घरात किती रोमॅण्टिक वातावरण आहे
ब) मला बरं नाही वाटतय
क) मला लेक्चरची तयारी करायचीय कठीण टॉपीक्स आहेत
(बटण)
पाहतो वाट एक महीना
दोन महीनेभर
कधी येतोय पिक्चर मॉर्निंगला
पंधरा रुपयात बाल्कनी
रेग्युलरला लागतात रुपये साठ
ओके ओके ओके
ठिके ई-स्क्वेअरला जावू
आत्ता या वयात नाहीतर केव्हा ?
सॉरी बटना
नऊ तरी इन्टेलेक्चुअल लिटररी सामाजिक कलेच्या गप्पांसाठी काढून ठेवतो विशेष टाईम
तेव्हा बटनाची माझी चांगलीच
जमते
एरवी डोक्यात उठत
राहतात बटनी वादळ
कवितेत विसावतो
परत
एक हलकासा विचार
कविता छापायचा करतो
रूपांतर कवितांचे असंख्य बटनात
दिसतात सगळीकडे
बटनच बटनच बटनच बटनच
डॉक्टर बटन
बगलेत बटन कधी तोंडात बटन
घालून
मोजतो किती बटन ताप झालाय
लिहितो कागदावर कोणते बटन
दिवसातून किती वेळा
जेवणा अगोदरचे बटन
जेवणानंतरचे बटन
चमच्यातून बटन
मेडिकलवाला बटन
मेडिकलमध्ये बटनच बटन
बटनी बसमध्ये बटनी कंडक्टर
सर्व शिटांवर बटनी चेहरे
बटनी थिएटर बटनी हिरो
बटनी मित्र
बटनी कॉलेज, कलीग्ज, स्टुडंटस
बटनी नात कॉलेजशी सगळ्यांशी होत
चाललेलं
बटनी सुपर शॉप बटनी किराणा
बटनी भाजीपाला
सोळा बुटयात एक बटन केळी
बटनी एस.टी.डी., बटनी सायबर
बटनी विचार बटनी आचार
चहा नाष्टा जेवण
सारं काही बटन बटन
मला मी बटन वाटू लागतो
माझ्या डोक्यात बटन
आरशात मला दिसतं मोठ बटन
माझं बटन दुखू लागतं
जोरजोरात
बटनी विचारांनी
रात्रीची बायको
कविता
काढतात मला बटनातून
त्या भोवऱ्यातून
एका बटन मुक्त विश्वात होतो
मी त्रास मुक्त
सकाळी मी
सापडतो मला
पुन्हा बटनी विश्वात
फरफटवून फरफटवून
आणला गेलेलो
त्या साडे दहा रु. अर्धा लीटर
चितळे म्हशीच्या दुधाने
पुन्हा सुरू होते
बटनी चाकोरी
मी एका बटनाने
झपाटलेला
पछाडलेला
बटन कॉन्शीअस माणूस