कविता – बाबू फिलीप डिसोजा

जन्म येशूचा

नक्षत्रस्थितीने  दाखविला होता मार्ग

मेंढपाळ आले शोधत घ्याया दर्शन

जन्म ख्रिस्ताचा झाला बेथलेहेम गावी

यशोहवा म्हणजे तारणहार नावी

जोसेफ मरिया चा पुत्र नाझरेथ

मार्ग, सत्य व जीवन मीच सार्थ

जेरूसलेम मध्ये परुशी नि याजक

केला वादविवाद अंधश्रद्धा विरोध

जादू होती त्याच्या स्पर्शात दिसले नित्य

चमत्कार म्हणावे केले अतर्क्य कृत्य

केले मृतांना जिवंत ,रोगी झाले बरे

दृष्टी मिळाली आंधळ्यांना

पाहिले ज्यांनी चालले त्याच्या मागून

वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून

हत्या करू नका, हिंसा करू नका

व्यभिचार करू नका, शपथ घेऊ नका

दोष लावू नका कुणालाही माया धरा

गरीबांची सेवा करा, प्रेम सर्वांवर करा

सर्वांसाठी गेला ख्रिस्त वधस्तंभावर सुळी

मरणातून उठला पुन्हा स्वर्गात गेला मुळी

  •  बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

                           पुनावळे, पुणे-४११०३३

                       मो. 9890567468