मला ही थोडं लिहु द्या
प्रतिभेच्या खोलीतून मला ही थोडं डोकाऊ द्या
अंगात किडे भरपूर मला ही थोडं लिहु द्या….
प्रतिक्रिया द्यायला विसरू नका…
वाचल्याशिवाय राहु नका…
श्रूगांर माझ्या लेखनीचा
सुना नको राहु द्या….
सजलेली साडी चोळी
त्यावर टिकली बांगडी….
अलंकाराने सजलेली लेखनी माझी
राहु द्या……
श्रूगांर माझ्या लेखनीचा साऱ्या जगाला
पाहु द्या.
लेखनीला माझ्या नजरेआड करू नका
वंचित आणि उपेक्षित तर मुळीच ठरवु नका..
नको काटकसर पैसा नाहीच लागत……
प्रतिक्रिया द्यायला “फक्त” मन मोठ होऊ द्या…
अंगात किडे भरपूर मला ही थोडं लिहु द्या
अंगात किडे भरपूर मला ही थोडं लिहु द्या…
वेदना
जन्म मी घेतांना आईने वेदनाच प्रसवल्या होत्या?
म्हणूनची जन्म माझा वेदना झेलण्याशी झाला होता?
नाव माझे काही असो पण वेदनाच हे माझे आंतरमनातील नाव असावे?
जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातील वेदनांनीच मी जगावे?
आणि अखेर वेदनांनीच मी मरावे त्या वेदनांनसह
वेदना गरिबीच्या, दारिद्र्याच्या जाती आणि पातीच्या
समाजातील समजल्या जाणाऱ्या संस्कृतीच्या
असंस्कृतीक वेदना मी सोसल्या होत्या?
वेदनांनी कल्लोळ माजवावा वेदनांनीच आक्रोश करावा
मात्र वेदनाकडे माझ्या समाजाने मूकबधिर असल्याच्या
सारखेच वागावे जगावे आणि बघावे?
- किरण मोरे, विद्रोही साहित्यिक, (22 वे न्यायालय, अंधेरी)