कर्म

कधी हळुच,कूणाचा बांध फोडते

शेतावरचे दुधी,भोपळे,तोडते

वाटत फिरते,नाती जोडते

समोरच्याची मते तोडते

जुळत आलेली लग्न मोडते

जनसेवेची व्याख्याने झोडते

देशसेवेत कधी मी पडते

भ्रष्टाचारात मीच सडते

नेता म्हणून गावात फिरते

खुर्ची येता निती घसरते

मतदाना साठी हात पसरते

कर्तव्य येता दात्यास विसरते

दोन पिढ्यांची दौलत जमते

अहंकाराच्या अधीन मी होते

बेइमानी मी माणूसकी विकते

बुडबुडे जसे तशीच टिकते

कर्म फळांची कडवट गोळी

चाखत बसते रिकामी झोळी

कष्टाची मिठ भाकर पोळी

खरंच त्याची चव आगळी

कुणाची फूले,कूणाचा देव

भजत नाही,नसतो चेव

दिनरात भूमीची सेवा

नको मजला काही रे देवा

हिरवे रान माझा स्वर्ग

घामाचा मज आहे गर्व

पडता क्षणी झडती सर्व

मिटता डोळे दिसे स्वर्ग

शेती गेली, भिंती आली

दिवाळीत ओटे पिकाने भरायचे

झोडणी,मळणीचे आवाज यायचे

कुटुंब सारं योगदान द्यायचे

गोणी भरताना आनंद लुटायचे

 कष्टात सणाला न्हाऊन जायचे

करंजी लाडूचे डबे भरायचे

मनसोक्त खाण्यात दिवस सरायचे

आता म्हणे शेतात नाही मरायचे ​

वाडा तांदूळ घरात भरायचे

कष्टात  लेफराइट वॉकिंग करायचे

पिझ्झा,बर्गरचे पाय धरायचे

शुगर,बी.पी.ने तारूण्यात मरायचे

गोडधोड सारं विसरायचं

आपल्याच कर्माने आपण घसरा

येतील सण दिवाळी दसरा

रेडिमेड सारेच,घरचं विसरा

  •  शकुंतला नारायण पाटील (नवाळे)